कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अवघं जग लॉकडाऊन झाले असले तरी चिंता आणि चिंतन यांपासून 'थोडे हटके' असे उपक्रम याही काळात अनेकांकडून केले जातात. मात्र राज्यातील दहा अंध गायकांनी आपल्याला 'भक्ती हीच शक्ती' हे विधान सार्थ ठरवत सुमधूर भक्ती-गीत गायनाचा 'आषाढी वारी 2020' सांगीतिक उपक्रम 27 जून ते 2 जुलै या कालखंडात ऑनलाईन पध्दतीने आणण्याचे निश्चित केले असल्याची माहिती "प्रेरणा असोसिएशन फॉर दि ब्लाईंड" या संस्थेचे सचिव सतीश नवले यांनी दिली. या ऑनलाईन सांगितिक कार्यक्रमामध्ये सामाजिक प्रबोधना बरोबरच सकारात्मक संदेश आणि जीवनाकडे पहाण्याचा उन्नत दृष्टिकोन देखील अनुभवयास मिळणार आहे.<br />#Palakhisohala #Wari #Live